सूर
सूर
1 min
1.3K
हरवले सूर कधी
नाही कळलेच मला
वाहवत गेलो सारा
खंत नसेच कुणाला
शोधण्यास सूर माझे
वाट सारीच चाललो
नाही गवसले काही
पुन्हा माघारीच आलो
बंध सुरांचे एकदा
जुळवत आलो सारे
विसरून गातो पुन्हा
गीत प्रीतीचेच न्यारे
मला शोधतो मी आता
झंकारून हृदय तार
गातो नव्यानेच गाणे
देऊ शब्दांना किनार
सूर सारे मखमली
कंठी आज हे जमले
शब्दाविना सारे कसे
ढग आभाळी दाटले
