STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

सुप्रभात!

सुप्रभात!

1 min
2.8K


आ आ .........आ आ....आआ..!

तंबोऱ्यावरी राग आळवितो

गाउनी भूपाळी

उठ भक्ता उठ आता

सकाळ रे झाली...!


आज चतुर्थी भाद्रपदाची

उत्सव बघ चालू झाला

अजून का रे तुझा

आळस नाही गेला...?


जागरण झाले फार देवा

थांब जरा घेऊ दे विश्रांती

मीच करता धरता या सणाचा

मनी ठेव थोडी शांती


गडबड गोंधळ करू नको

मोदक करते ती मायेने

सावकाश होऊ दे सारे

पार पाडुया सारे समाधानाने


आळव तू कोणताही राग

फरक काही पडणार नाही

राग तुझा रे आम्हा देवा

तूस भरही येणार नाही


तुझ्याकडे ना कर्णा

ना कर्ण कर्कश्श डॉल्बी

भीती कसली घालतोस मला

तुझ्या मधुर तंबोऱ्याची


बरे वाटते आज मला

गायन तुझे कर्णमधुर ऐकून

असेच वाटते मला देवा

रहावे अंथरुणातच पडून....!!!


Rate this content
Log in