STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2.5  

Prashant Shinde

Others

सुप्रभात...!

सुप्रभात...!

1 min
618



सुरुवात झाली पुन्हा दिवसाची

प्रभात सोन घेऊन आली

भाळीच भाग्य पदरात घालून

तटस्थ पणे कौतुकाने हसली


म्हंटल भाग्य सौभाग्य

तू म्हणतोस खरं

पण

मला एकदाच सांग बाबा

मला देऊ केलेलं सौभाग्य

आप्तांना पाहण होईल का...?

ही संक्रात आसूयेची

कधीतरी नाहीशी होईल का..?

कारण

माझं अनुभवाच बोलणं हे

अगदी बाबा साधं आहे

शुभेच्छा दिल्या तरी

प्रतिक्रियेत ही माझ्या माणसाचं

स्पष्ट कोतं मन दिसत आहे

गोड गोड बोला म्हंटल

तर त्यांनी बोलणंच टाकलं

वाटलं अरे देवा हे काय झालं...?

मग लक्षात आलं

आपेक्षेत, आशेत दुःख दडलेलं असतं

सुखासाठी इथे

निरिच्छ होणच चांगलं असतं

आणि खर सांगू

शुभेच्छा देऊन मी मन मोकळे केलं

तेंव्हा कोठे मनाला समाधान लाभलं...!


मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुप्रभात...!


Rate this content
Log in