सुखविती मृगधारा
सुखविती मृगधारा
तापलेल्या धरेवर
कोसळता जलधारां
होई ओली चिंब धरां
खुश बळी तो बिचारां. ••••••••1
मृग बरसता दिसे
धरा हिरवी हिरवी
दिसे निसर्ग हिरवा
येता झाडाला पालवी .•••••••••••2
येता मृगाचा पाऊस
सुरवात हंगामालां
वखरणी करुनिया
सजवितो जमिनीलां . ••••••••••3
सारे फाडूनी करतो
सुरवात टीबण्याची
येता पाऊस सारखा
भीती मागे पडण्याची .••••••••••4
धान पऱ्यातं टाकता
धान वापुनिया येई
मृग नक्षत्रं पडता
पऱ्हे भरूनिया जाई .•••••••••••5
सोयाबीन तूर मूग
येई वापूनिया वरं
ओल्या मातीत दिसते
वर कोवळे अंकुरं . •••••••••••6
बरसता मृगं धारा
नद्या नाले भरतातं
पाणी दिसता नयनी
प्राणी पक्षी आनंदातं .••••••••••7
जाई बदलून सारे
येता मृगाचा पाऊसं
सुखवीती मृगधारा
हर्ष सर्वांच्या मनासं .••••••••••8
शेत दिसते हिरवे
पीक वाढता जोरातं
सुखविती मृगधारा
शेतकरी आनंदातं. ••••••••••••9
