सुखाची आस. २५/०४/२००७
सुखाची आस. २५/०४/२००७


अगीवरी शिंपी ती चांदणे
जश्या मृगाच्या सरी.
तसेच अवचित सुख
लाभावे मला एकदातरी... ...
तलम रेशमी पंख पाचूचे.
चढली त्यावर हिरे माणके.
फुलपाखरू तसे सुखाचे.
बसू दे खांद्यावरी...१.
मनी सुखाची आशा मोठी.
नाम सुखाचे माशा ओठी.
सुखासन घ्यावे ओंजळीत मी.
टपोर गारे परी...२.
कधीतरी सुख यावे नशिबी.
सुख हे माझे स्वप्न गुलाबी.
बालमित्रसे सौख्य निरागस.
येईल तेव्हा घरी?