सत्य
सत्य


मार्ग हा खडतर, नाही चालणे सोपे यावर.
यातना होतील कठोर, फळ मिळेल कवर.
बाजू जमेचीच नव्हती, तेव्हा सर्वा बोचू लागली.
आयुष्याच्या खेळा मधी, आयुष्यानेच केली खेळी.
आज खचलो तो खुप, नाही इच्छा उठण्याची.
अंत एकदाचा व्हावा, वाट पाहतो संपण्याची.
तेव्हा मध्ये ध्यानी येते, अजून खुप बाकी आहे.
कर्तव्यातून मुक्त होण्याकरीता, कर्म थोडा करने पाहे.
कर्माचीच फळे भोगतोय, सांभाळून सर्व काही.
बीज जातिवंत पेरले, या वक्ती उगवेल औरच काही.
संपल सगळं मोडून पडलो, तरी आपले आहेत सोबती.
या वळणावरती आयुष्य माझे, एक वेगळ्या द्रुष्टीने पाहती.
झाल्या चुका काही घडत गेल्या, घडले काही कृत्य.
अमोल अशी अक्कल विकत घेतली, सदा बोलावे सत्य.