STORYMIRROR

Balika Shinde

Others

4  

Balika Shinde

Others

स्त्री

स्त्री

1 min
26.7K


स्त्री म्हणून जगताना ..

अभिमान वाटतो मनाला...


रुपं माझी खूप

प्रत्येक नात्यात दिसतं माझं नवं रूप...


कधी आईची लाडकी लेक...

तर कधी सासु-सासऱ्यांची जिम्मेदारीने वागणारी सून...


कधी मुलांची प्रेमळ आई..

तरी कधी पतीची आवडती पत्नी...


कधी नणंदेची जीवलग मैत्रिण...

तर कधी दिराची चांगली सल्लागार वहिनी...


मी जशी आहे तशीच राहणार

स्त्री म्हणून जन्माला आले त्याच सार्थकी लागणार..



कितीही खचले..कोलमडले तरीही मी माझ्या माणसांसाठी नव्याने उभी राहणार....


कारण मी एक स्त्री म्हणून जन्माला आले

स्त्री म्हणूनच अभिमानाने जगणार...


Rate this content
Log in