STORYMIRROR

Nalanda Wankhede

Others

3  

Nalanda Wankhede

Others

स्त्री! तुला घाबरलंच पाहिजे

स्त्री! तुला घाबरलंच पाहिजे

1 min
533




पुरुषप्रधान संस्कृतीचा

दबदबा कायम राहण्यासाठी

हे स्त्री! तुला घाबरलंच पाहिजे


चार भिंतीच्या आत बंदीस्त

राहिलचं पाहिजे


निर्लज्जपणे स्वतंत् कशी फिरतेस

आडोश्याला तुला बसलचं पाहिजे


देवळात जाण्याची बंदी

विटाळ तुझा केलाचं पाहिजे


चूल आणि मूल हेच तुझे क्षेत्र

बुरख्यात तुला राहायलाचं पाहिजे


काळे काळे कुंतल पाठीवर नागिनी सारखे

केशमुंडन तुझे करायलाच पाहिजे


काय करायचं तुला शिक्षित होऊन

शिक्षकाचा हक्क तुला नाकारलाचं पाहिजे


पुरुषांच्या वासनेची विषयवस्तू तू

समान दर्जा तुझा झिडकारयलाचं पाहिजे


पुरुषांचे वर्चस्व टिकविण्यासाठी

हे स्त्री! तुला घाबरलंच पाहिजे



कवयित्री नालंदा वानखेडे

नागपूर


Rate this content
Log in