स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
793
अफाट शक्ती तुजपाशी
कामगिरी कर साजेशी
तू अबला नाहीस
कर तू साहस
नको घाबरू संकटाला
शत्रूवर कर हमला
तुझ्यात रूप दुर्गेचे
तोड लचके शत्रूचे
सन्मान आहे देशाचा
गुण तुझ्यात कर्तव्याचा
घाबरू नको कशाला
संधी तू दे स्वतःला
तुझ्यासंगे आहे जनसागर
स्त्री शक्तीचा जागर
आहे अनमोल मूर्ती
जगात तुझीच कीर्ती
तुझे अनेक रूप
दे त्याला स्वरूप
सावर तू स्वतःला
ओळख शक्तीला
