स्त्री म्हणजे खेळणे नव्हे
स्त्री म्हणजे खेळणे नव्हे
नैतिकतेच्या मर्यादेचं खापर माझ्यावर
फोडून
तुझ्या विखारी नजरेचं विष तू नजरेत माझ्या सोडू नकोस
पाहिली तुझी विविध रूपे मी
लाचार ,विवश , दुर्बळ वस्तीत घिरट्या मारीत
सरड्या सारखा रंग बदलणारा
आव घरात सज्जनतेचा तू आणू नकोस
स्त्री हवं तेव्हा खेळायला ती खेळणं नाही
हे विसरून
आग तुझी विझविण्यासाठी ती पाऊस नाही
मालकी हक्क तू गाजवू नकोस
आजची स्त्री आहे सशक्त,कणखर, कर्मठ
इतिहासात जातोस
पुरुषप्रधान संस्कृतीचा आडोसा घेऊन
नीतिमत्तेच्या मूल्यानां पायदळी तू तुडवू नकोस
माणूस आहे मी तुझ्याच सारखी
यशासाठी वापर करूतोस
असेल मनगटात आणि परिश्रमात ताकद तर
भूलथापांना बळी तू पडू नकोस
नको मला दुर्गा, काली, लक्ष्मीच्या उपमा
भावनांशी माझ्या खेळून
जीवनाच्या रथाची दोन चाकं आपण
बलवान एक दुसऱ्याला तू पंगू करू नकोस
वाट्टेल तेव्हा शरीराशी खेळून माझ्या
मर्दांगी आपली दाखवून
नाही रे छप्पन इंचाची छाती तुझी
विस्तावाशी तू खेळू नकोस
स्त्री आहे हाडामांसाची व्यक्ती तुझ्याच सारखी करमणुकीची वस्तू समजून
मायावी विश्वात ओढून देहपातळीवर जगण्या इतपत मी मूर्ख आहे हे तू समजू नकोस
घरदार, कुटुंबासाठी त्याग करते सर्वस्वाचा
मुळूमुळू रडत बसण्या फोटोमधली फ्रेम नाही
अकलेवर ताशेरे माझ्या तू ओढू नकोस,
तसूभरही मी कमी नाही
वादग्रस्त विधाने कर कितीही, आत्मविश्वासाला मी ढळू देणार नाही
बुद्धीची माझ्या तपासणी तू करू नकोस
प्रगल्भता नसलेल्या विकृत मेंदूचं शिरसंधान जरा करून घे
वासनांनी भरलेल्या नजरेला स्मशानभूमीत जरा तू गाडून ये
आणि स्पर्शामधला कुत्सित लपलेला विषारी नाग जंगलात जरा तू सोडून ये
