Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

MAHENDRA SONEWANE

Others

3  

MAHENDRA SONEWANE

Others

सृष्टी सुंदर नयनी

सृष्टी सुंदर नयनी

1 min
252

पाहतो हा निसर्ग

दिसतो किती सुंदर । 

सृष्टी सुंदर नयनी 

हिरव्या रंगाची झालर ।।

पडती सोनेरी किरणे 

निसर्गाचे रुप साजे । 

पाहुन त्याच्या सुंदरतेचे 

पक्ष्यांचे सुस्वर नाद गाजे ।।

नटली हिरवी धरती 

दिसती तिचे रुप वेगळे । 

मोर पिसारा खुलवून येतो 

नाचतो ते पाहती सगळे ॥ 

सृष्टी सुंदर नयनी भरली 

इंद्रधनुचा रंग खुलवूनी । 

पक्षी प्राणी हलचल करीती

वनदेवी ही येते फुलूनी ॥ 

वनात झरझर नदी वाहते 

पाने फुले ही मिसळून जाती । 

डोंगराच्या खाली पायथ्याशी 

आपण मस्त विश्रांती करीती ॥ 

Rate this content
Log in