सरले वर्ष
सरले वर्ष
1 min
211
विश्वा ग्रासिले रोगानी
कोरोनाच्या भयंकर
छोट्या विषाणूच्या लीला
वर्षभर हाहाकार
वर्ष सरले भीषण
आठवणी घोर मनी
नको येऊ पुन्हा कधी
जारे कोरोना पळुनी
गतवर्षी रचले होते
खूप संकल्प ईमले
आता नवीन वर्षात
साधू साध्य मनातले
एकमेकां साथ देऊ
गरीबांसी हात देऊ
भुकेल्याला अन्न देऊ
संकल्पांची पूर्ती करु
