सर तुम्ही नसत्ता तर----
सर तुम्ही नसत्ता तर----


लहानपणीच्या आठवणींना उजाळा देताना
मराठीतले काना, मात्रा वेलांटी आणि ऊकार,
संस्कारांच्या ओझ्याखाली उथळ माथ्याने जगण्याला
आणि माझ्या आयुष्याला दिला असता का कोणी आकार ?
आदराचे श्रद्धास्थान, शील, क्षमा, करुणेचा अथांग सागर
पुस्तकांशिवाय ज्ञानभांडार आणि ज्ञानदानाची घागर
भौगोलिक चंद्र, सूर्य, आकाश, गृह आणि तारे
कोठून समजले असते कामला खारेवारे ?
श्रद्धाज्ञान देते, नम्रतामान देते, योग्यतास्थान देते
परंतु हे तिन्ही गुण मिळाले तर व्यक्तिला सम्मान येते
डॉ.राधाकृष्णन, शाहू, आंबेडकर आणि फुले
कोणी शिकवलं असताकासंभाजी आणि शिवाजीराजे भोसले ?
बागेतल्या रोपट्याला पाणी घालणारा माळी आणि बाप माझा शेतकरी
शाळा हेच मंदिर आणि आई या शब्दाची ओळख करणारा गुरुजीं
गणितातला लसावि, मसावि आणि शेअर बाजार,भागाकार
आयुष्याच्या प्रवासात कोठून झाला असता माझ्या संस्कारांचा गुणाकार ?
आदर्श जीवन आणि ज्ञानाचा महामेरू
तत्वातून मूल्ये घडविणारा आणि पावित्र्य जपणारा
पायथागोरसाचा सिद्धान्त, घनफळ, आणि काटकोनी
भाकरीचा चंद्र आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध समजावला असता का कोणी ?
मैलाच्या दगडाला कोरून हिरा तुम्ही बनवला
आईवडिलांच्या जागेवर येऊन आधारवड तुम्ही झाला
इंग्रजीच्या A -अँपल पासून Z- झेब्रा या अक्षराने मिळाला मान
प्रदेशात फिरताना वाढवली असती का हो कोणी आमची शान ?
जीवनाचे मार्गदर्शकच नाही तर मार्गच तुम्ही आमचे बनले
जीवाचे रान करून मनुष्यच नाही तर आदर्श व्यक्तिमत्व घडविले
समाजसेवेचे धडे घेताना शिकवले नागरिकशाश्र आणि समाजकारण
नाहीतर चौकाचौकातल्या गप्पातून समजले असते का हो राजकारण ?
आठवणींच्या हिंदोळ्यावर आयुष्यआम्ही जगतो
जीवनाच्या प्रवासात प्रत्येक क्षण स्मृतीत ठेवतो
व्यवहारातील ज्ञानामुळे समजले आम्हाला अर्थ
नाही तर आमचे जीवनच नसते झाले का हो व्यर्थ ?
विसराव्या कशा त्या रममाण शाळेच्या आठवणी
योग्य मार्गदर्शनाची साथ नसती तर आयुष्याची झाली असती भ्रमंती
व्यक्तिमत्वाचा हा आदर आणि भरमसाठ स्वप्नांचे शिलेदार
नाही तर कसे झालो असतो आम्ही भावी पिढीचे शिल्पकार?
सर तुम्ही नसता तर-----------