STORYMIRROR

Vanita Shinde

Others

3.5  

Vanita Shinde

Others

स्पर्धेसाठी

स्पर्धेसाठी

1 min
51


सोडून सर्व माहेरचे पाश

बनते लेक पतीची स्वामिनी,

मुखी तिच्या सासरी सदैव

माहेरचीच असते कहाणी.


ऐकला माहेर हा शब्द जरी

तरी टचकन भरती नयन, 

लेकीच्या मनी नकळतच

उलगडती सुख दु:खांचे क्षण.


घर अंगणी खेळून दवडून

जाते भुर्रकन बालपण,

लग्न होता सासरी येते 

क्षणोक्षणी माहेरची आठवण.


माय पित्याचा आधार

असतो लेकीला खंबीर,

सु संस्काराची शिकवण

बाईला शिकविते माहेर.


कधी अपशब्द कुणाचा

आला माहेरच्यांच्यासाठी,

लेक चवताळून उठते अन्

हुंदका दाटतो तिच्या कंठी.


बाईचा श्वासच जणू

असते तिचे माहेर,

पाठीराखा भाऊराया

देतो तिला प्रेमाचा आहेर.


जीव गुंतला सासरी तरी

असते माहेरचीच ओढ,

सर्व नात्यांमध्ये तिला

वाटते माहेरच गोड.


Rate this content
Log in