स्पर्धा
स्पर्धा
आयुष्याच्या वळणावर जावे लागते सामोरे स्पर्धेना
कधी हरत कधी जिकंत जगावे लागते जीवनाला
लहानपणी अभ्यासाच्या परीक्षेत मिळवावे लागतात अव्वल गुण
मोठेपणी नोकरीच्या मुलाखतीत अटकतो जीव
संसाराच्या गराड्यात स्पर्धा असते कुटुंब सांभाळण्याची
नोकरीत प्रमोशनसाठी चढाओढ भारी
महिलांच्या साड्यावरुन स्पर्धा
टीव्ही वर संगीत नृत्याच्या स्पर्धा
जो तो उतरला आपला स्टेटस उंचावण्याचा स्पर्धत
स्पर्धने ग्रासलंय जीवनाला
जिकणंच आहे सर्वाना