सोनपाखरू
सोनपाखरू
तरुण उन्हाचे सोनपाखरू फांदीवर बसले.
लता तृणांचे गर्द पिसारे खुदकन गाली हसले.
आभाळाची नवी निळाई उतरुनी ये खाली.
संत भाबड्या जलाशयाची सखी आज झाली.
पहिले वहिले गूज त्यांचे क्षितिजावर ठसले. &nb
sp;
एक लाडका मेघ सावळा उगीच रेंगाळला.
इंद्रधनूची कमान पाहून मनात ओशाळला.
बघता बघता क्षणात तेथे विश्व नवे दिसले.
जागेपणी हे दृश्य पाहून स्वप्नी डोळे फसले.
श्रावण शोभा अशी निरंतर जीवनात यावी.
मुरगळलेली कली मनाची नवजीवन ल्यावी.