STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

सोमवार...!

सोमवार...!

1 min
14.4K


सोमवार आज बऱ्याच

घरच्या गौरी गणपतीचे

विधिवत विसर्जन....!!!!!


षोडशोपचारे पूजाअर्चा भावली

भावनिक मी आज झालो

निरोप तुमचा घेता घेता मी

मनापासूनी की रे गहिवरलो


चार पाच दिसांची संगत

रंगली नित्य किती छान पंगत

गोडधोड अन मोदक खाऊन

खरोखर गेलो रे भारावून


आज जाता जाता आशीर्वाद देतो

शिरावरूनी कृपेचा हात फिरवितो

रहा सुखाने एकदिलाने या धरतीवरी

पुन्हा पुढल्यावर्षी नक्की येईन मी माघारी


तोवर नका करू काही उधारी

नको काही तंटा शेजारी पाजारी

नका पडू रे कोणी आजारी

वाहूदे जीवन सरिता आनंदे साजिरी


संकल्प पूर्ती करण्यास

जोडा नियतीने सारा अर्थ

साधा थोडा थोडा परमार्थ

आहे पाठीशी मी सदा समर्थ....!!!


Rate this content
Log in