STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

सोमवार पुन्हा आठवडा सुरू...!

सोमवार पुन्हा आठवडा सुरू...!

1 min
394


सोमवार पुन्हा आठवडा सुरू...!

सो सले खूप असे वाटले

म ला उठताच क्षणी

वा ट पाहिली खूप

र स्त्यात भेटले नाही कुणी

पु चाट जीवन सरले

न्हा णे आनंदात जमले नाही


आ ळसटले जीवन हे

ठ कवून मज अजून थकले नाही

व रवरची माया सारी

डा व साधतच राहिली

सु खासाठी मज सदैव

रु सवतच हसत होती

म्हंटले आज नवीन डाव मांडतो

नव्या दिवसाची सुरुवात पुन्हा करतो


तुला आता वेठीस धरतो

कष्टाची बघ रास उभी करतो

तुला खेचून लीलया

जीवनात घेऊन येतो

अपयशाने बघ मी खचलो नाही

यशस्वीतेस आता बघ

पर्याय दुजा उरणार नाही


ही सकाळ माझी

हा दिवस माझा

नियती तुझा आता तोरा

माझ्या समोर चालणार नाही

यश दिल्या विन दैवा

तुला आता मी सोडणार नाही


यश हसले क्षणात

पाहुनी दृढ संकल्प माझा

नाईलाज झाला नियतीचा

आशीर्वाद दिला यशाचा

सूर्योदय आजचा होता होता....!


Rate this content
Log in