STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

संविधान सांगे...!

संविधान सांगे...!

1 min
12.4K


संविधान सांगे मला हेच...!!


संगत चांगली सर्वांना मिळू दे...!

विचारांची देवाण घेवाण होऊ दे...!

धागडधिंगा कायमचा नष्ट होऊ दे...!

नकारत्मकता सारी दूर निघून जाऊ दे..!


सांजेला कुटुंब परिवार

सुखरूप परत घरी येऊ दे...!

गेले समाधान पुन्हा लाभू दे ..!

मनातील अविचारांचे

जळमट जळून जाऊ दे...!


लाल केशरी तेजोमय उज्वल

उन्नत धवल हरित क्रांतीचे

यशस्वी जीवन घडू दे...!

हे स्वप्न हृदयीचे साकार होऊ दे...!


चला उठा सकारात्मकता

आता सदैव नांदू दे

सृजनशीलतेचे जीवन घडू दे

प्रगतीचे पाऊल सदा पुढे पडू दे

स्वच्छ सुंदर भरतभूवरी या

आनंदी जीवन सर्वांचे होऊ दे....!!



Rate this content
Log in