संविधान ( काव्यांजली )
संविधान ( काव्यांजली )
1 min
23.1K
आम्ही भाग्यवान
भारत आमचा देश
वेगवेगळे वेश
एकतेत
बोली वेगळी
असे आप आपली
राष्ट्राची जाहली
हिंदी
सण उत्सव
रेलचेल धम्म धर्मात
आनंद वर्षात
सप्तरंगी
थाळी सजते
बघा वैशिष्ट्ये जपत
पाहुणचार चाखत
पोटभर
भोगोलिक वारसा
पर्यटक येऊन पाहती
भारावून बघती
कुतूहले
विविधतेत एकता
हाच मंत्र येथला
नाहीच थकाला
स्वागतास
आम्ही भाग्यवान
एका माळेत विणले
बाबासाहेबांनी लिहले
संविधान