STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

संवाद मौनातले

संवाद मौनातले

1 min
26.5K


संवाद बोलके

नाही कधी झाले

मौनातच जन्मा आले

मौनातच वाहुन गेले

नजरानजर त्या

मोहक स्वप्नांची

हलके आनंदी क्षण

देवून गेले ...

हिरव्या पालवीच्या रेषांवर

अक्षरे उमटताना

स्वप्नील डोळ्यांना

वेडावून गेले

सवड काढुन मग

पुस्तक चाळताना

पानापानांतुन ....

स्मीत हास्य उमटले

सांगायला काहीतरी

काळोखात आले

भलतेच मुकाट ओठ

बोलून गेले

संवाद बोलके

अबोल झाले ...

आठवणींचे पाखरू

झेप घेताना

स्फुर्ती आयुष्याची

मला बोलावते

नदीकाठी परत

तीच शपथ घेते

मौनातच जन्मा आले

मौनातच राहू दे...

संवाद अबोल

बोलके न होवू दे !!


Rate this content
Log in