संत तुकाराम(विष्णुपंत पागनिस)
संत तुकाराम(विष्णुपंत पागनिस)
पंढरीची वारी चालू आहे. संत तुकारामांची आठवण सदैव उरी राहणारच.पण ज्या संत तुकारामांना पडद्यावर संत तुकाराम चित्रपटातून आपल्या निरागस अभिनयाने अजरामर केले त्या विष्णुपंत पागनिसांनाही कोणीही विसरू शकत नाही.ज्यांनी खऱ्या अर्थानी संत तुकाराम अनुभवला आणि तुकारममय झाले.शेवट पर्यंत तुकारामांचा वेष सोडला नाही .सारे जीवन तुकाराम मय होऊनच व्यथित केले.त्या भूमिके साठीचे मानधनही त्यांनी स्वीकारले नाही.मुंबई सारख्या शहरात त्या काळी त्यांच्या समोर आदराने प्रेमाने लोक नतमस्तक व्हायचे .त्यांची आठवण झाली म्हणून हा शब्द प्रपंच आणि त्यांच्या स्मरणार्थ चार ओळी....!!!
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग...!!
तुकाराम मय विष्णुपंत..!!
भक्तीची शक्ती
असते अफाट
जाणते मन
बिन भोबाट
तुकाराम दिसले
विष्णुपंतांच्या रुपात
आम्ही पाहिला
तुकाराम सिनेमात
दामल्यांची कलाकृती
अजरामर झाली
तुकोबांची महती
जगास कळाली
विष्णुपंत पागनीस
तुकाराम झाले
भिनले तुकाराम
हृदयी आजन्म
तेच धोतर
तीच बारा बंदी
पागोटे डोईस
राहिले अंगाशी जन्म भर
असा कलाकार
विष्णुपंत आजन्म
तुकाराम होउनी
अजरामर झाला
तुकाराम मय होउनी
सारले सारे जीवन
बिदागी न घेता
तुकाराम झाले अंतर्बाह्य
महान ते संत तुकाराम
महान ते पंत विष्णुपंत
सर्व महान सर्व गहन
भागली अवीट भक्तीची तहान
भाग्य हे आपले रूपासाठी
लाभले विष्णुपंत पागनीस
पाहिले जाणले साठले हृदयी
तुकाराम तोषण्या अंतरास.....!!!!
