संस्कार
संस्कार

1 min

107
प्रकाशाने दूर
होईल अंधार ।
मायेचा आधार
घडावे संस्कार ।।१।।
मनाचे ऐश्वर्य
सौंदर्य संस्कार ।
मनाचे हे भाव
आदर्श संस्कार ।।२।।
पैसा जरी हाती
आहे विनम्रता ।
मातेलाही जेथे
मानती देवता ।।3।।
खरे ते संस्कार
ठेवूनिया भान ।
पुरुषही देतो
स्त्रीयांना सन्मान ।।४।।
ममता जिव्हाळा
आणि आपुलकी ।
माणसाला देते
सुजाण संस्कृती ।।५।।
मनावरी माझ्या
संस्काराचे राज्य ।
वर्तन ठेवतो
राहून मी सज्ज ।।६।।