संसाराचे गाणे
संसाराचे गाणे
1 min
12.4K
संसाराचे गाणे
सह सबंधाणे गुफंले
भाव भावनांचे दोर
मळून मळून विणले
एकमेकांची सोबत
घेऊन सर्व रंगले
जीवनाच्या वाटेवर
स्वप्न रंगले भंगले
जीवन गाणे चाले
दळत्या जात्यावर
सुख दुख कांडती
आयुष्याच्या भात्यावर
लहान मोठे सर्व
चुणे आनंद एक एक
सर्वाच्या हिमतीने
आत्मविश्वासाची मिळे टेक
पूर्ण आयुष्य चालले
एका छताच्या छायेत
किती मुक्त तो स्वास
घेता येतो ममतेच्या मायेत
सुखी संसार नांदतो
जसा मधाच्या गोडात
संसाराचे दोन चाके
योग्य दोघांच्या जोडात
जीवनाच्या वाटेवर
एकमेकांची ठेवा उमज
सांसारीक जीवनात
मनांची ठेवावी समज
