संसार सुखाचा
संसार सुखाचा
1 min
1.0K
संसार नाही फक्त दोघांचा,
आहे साऱ्या कुटुंबाचा,
सासूसासरे, नणंद, दीर,
आणि आहे जावाभावांचा.
खेळती बागडती लहानगी,
आणि आहे थोरामोठ्यांचा,
एकत्र साऱ्यानी मिळूनमिसळून,
. हसतखेळत वावरण्याचा.
झाल्या जरी चुका काही,
समजावून सांगण्याचा,
आल्या काही अडचणी,
सर्वांनी सामोरं जाण्याचा.
होतील भांडणतंटे कधी,
सामोपचाराने मिटवण्याचा,
एकमेकांना समजुन घेऊन,
अधिकाधिक फुलवण्याचा.
