संसार म्हणजे
संसार म्हणजे
1 min
13.7K
वेंधळा होता परिचा
तरीही सांभाळून घेणे सुरू झाले
स्वयंपाकाचे मीठ गडबडले तरी
चविष्ट म्हणणे सुरू झाले
त्याला आवडायचं फुटबॉल
तिला आवडायचं क्रिकेट
कधी व्हायचा गोल
कधी पडायची विकेट
तेव्हा त्यांच्या लक्षात आले
संसार म्हणजे खेळ नसतो
आवडी निवडी वेगळ्या असूनही
दोन जीवांचा साता जन्माचा मेळ असतो

