STORYMIRROR

Umakant Kale

Others

2  

Umakant Kale

Others

संपते यात्रा रोज ?

संपते यात्रा रोज ?

1 min
3.0K


रोज संपते हो यात्रा

येथे त्या एका प्रेताची

रोज हरते आयुष्य

हीच व्यथा त्या ज्येत्याची

चित्र संघर्षाचे चाले

रंग आसवाने देई

मग शेवटी हो त्याला

आग सरणाची येई

नाही उरला कुठे ही

त्याच्या नात्याचा दुवा

बघा मरणोत्तर ते

नाव ही विसरे बुवा

फुटे कवटी संपला

खेळता हा आता जसा

हीच रित याच जगी

सांगे जळता तो जसा


Rate this content
Log in