STORYMIRROR

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

सण रक्षाबंधनाचा

सण रक्षाबंधनाचा

1 min
50

कधी कधी दंगा मस्ती

कधी लटके भांडण

त्याने दणाणून जाई

साऱ्या घराचे अंगण


लग्न होऊन बहीण

तिचा संसार थाटते

भावा पासून लाडकी

ताई दूर देशी जाते


बंध रेशमी धाग्याचा

ओढ लागते जीवाला

येता राखीचा उत्सव

ताई येते माहेराला


राखी बांधते भावाला

आणि सांगते देवाला

सुखी ठेव नारायणा

बहिणीच्या बांधवाला


सण अतूट प्रीतीचा

मऊ मऊ रेशमाचा

हळुवार गुंफीतसे

धागा पवित्र नात्याचा


Rate this content
Log in