संक्रांत...!
संक्रांत...!
1 min
424
काल काय झाल
तिळगुळाच पाकीट आलं
गोल मटोल
खूप गोड अन खूप छान
तिळगुळ घ्या गोडगोड
मला बोला म्हणाल
मला पटकन ते
नाही कळाल
मी पाहिलं
तशी ती खुद्दकन हसली
म्हंटल हसली
म्हणजे नक्की फसली
तेवढ्यात संक्रांत
मागून ठेक्यात आली
गोड बोलण्या अगोदरच
जाम बरसली
अहो जरा आतले
तिळगुळ घेऊन या
आणि तुम्हीच सर्वांना
ते थोडे थोडे द्या
फसलेलं पाकीट
कोपऱ्यातनच खुललं
खळीच्या वाटीत मला
ते भलतंच गोड वाटलं
वाटीत तिळगुळ घालणार
तितक्यात संक्रांत डोकावली
आणि तीळगुळाची वाटी
देव जाणे कशी गायबच झाली.....!
