संकल्प....!
संकल्प....!
संकल्पाच्या ओझ्याखाली
सुंदर सकाळ गुदमरते
उगाच यशासाठी मग
नितदिन मरमरते
नको नकोत्या शेंदूर लेपीत
दगडांच्या पायी झुकते
आणि प्रयत्नांच्या राशी
रक्त सांडूनी फुका रचते
मागे वळून पाहता
अपयशाचा खच नजरेस पडतो
नशिबाला दोष देत
सारा प्रवास झालेला दिसतो
अडथळ्यांची शर्यत ही
आपल्या भोगात आलेली दिसते
म्हणून तर जीवन जगण्याची
खरी तयारी झालेली असते
आता भय सारे पहा
सकाळी सकाळी जाताना दिसले
भाग्य यशाचे दारी आले
म्हणून तर संकल्पाचे कौतुक करावे वाटले
संकल्प केला नसता तर
प्रयत्न काही झाले नसते
प्रयत्नच झाले नसते तर
भाग्यच नशिबी खुलले नसते
म्हणून सांगावे वाटते आज मला
संकल्पाचे ओझे ओझे नसते
प्रयत्नांना बळ देण्याचे ते टॉनिक असते
सकाळी सकाळी यशासाठी ते घ्यावे लागते...!!
