संगणक
संगणक
1 min
11
किचकट काम आता
झाले खूप सोपे
कमी झाले मग
फाईलींचे थापेच्या थापे
पेनात शाई भरण्याची
नाही राहिली कटकट
कामे होऊ लागली
सारी कशी पटपट
संदेश पाठवता
येतो क्षणात कुठेही
अडत नाही कोणाचेच
बाकी काही
संगणक बनला आपल्या
जीवनाचा अविभाज्य घटक
त्याला वापरण्याची सर्वांनाच
लागली जणू चटक