संघर्ष
संघर्ष


मी माझ्या पलीकडचं जग,
घेऊन आहे सोबतीला,
रंग नाही, रूप नाही,
अंतरीतल्या झोपडीला,
अनंत प्रश्न आहेत,
हातांच्या ओंजळीत,
उत्तरांची साद नाही,
स्वप्नांच्या गोफणीत,
शोधत आहे स्वतःला,
या गजबजलेल्या वाटेवर,
एकटीचाच हात आहे,
माझ्याच त्या हाकेवर,
पाहून मी दुःख माझे,
ना अंतरी अचंबित आहे,
जाणते स्वतःस मी,
लढणे हे अखंडित आहे,
उराशी आहे भय हरण्याचे,
विचारांची तलवार पेलते,
भावनांची परडी घेऊन,
माझ्या हास्याची फुले झेलते,
हसता हसता रडून जरासे,
करते मोकळे हाल जीवाचे,
विसरून जाते सारे बहाणे,
जपते वीरपण या वीराचे,
जिद्द ही अशीच राहील,
प्राण ओतूनी लढत राहील,
मिळवीन सारे अवकाश मुठीशी,
अशाच उंचीवर स्वतःस पाहील...!