संघर्ष ( कविता )
संघर्ष ( कविता )
1 min
426
अश्वासनाच्या दुनियेत
संघर्ष जगण्याचा
सर्व काही अलबेल
प्रश्न पोटा पाण्याचा
रस्त्यावर खड्डे तरीही
टोल भाराभर घ्यायचा
कळत नकळत हाताने
खिशाला रिकामे करायचा
जाहीरातींचा सुकाळ
फार्स तो भरतीचा
फी भरून भरून
एज बाद होण्याचा
आदर्श म्हणून मानणे
पक्ष बदल करायचा
स्वतःच्या ताटात ओढणे
खेळ सारा हडपण्याचा
एक दिवस बदलेल हेही
घ्या श्वास आशावादाचा
रस्त्यावर उतरावेच लागेल
संदेश हाच संघर्षाचा
