Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

संग

संग

1 min
223


वसंत जीवनात फुलणे

अजून तरी बाकीच आहे

आभाळ कवेत घेण्या इतुकी

ठाऊक झाली शक्ती आता


अधरी असे जे नाम प्रभूचे

आनंद जीवनी खोल असे

आजवरी चुकलोच होतो

काय जीवनाचे मोल असे


उभा जन्म हा कृतार्थ झाला

संग लाभला मला भला

पावन माझे जीवन झाले

गत जन्मीचे भाग्य उजळले


आभार काय मानू तयाचे

जगी महापुरुष जो आला

जनामनाला जागविण्याला 

नाथ अनाथांचा तो झाला


असून जरी मी पुत्र ईश्वरी

ध्यानी मनी नव्हतेच कधी

हलकेच थाप पाठीवरी

खरोखर स्पर्श तो होता दैवी


नाहीतर या पत्थराला

कुणी स्पर्श का केला असता?

जमेल तैसे दूर सारुनी

माघारी जो तो वळला असता


पाऊल पुढती पडे जयाचे

समाधान जीवनात तयाच्या

करेल जगी जो काम प्रभूचे

सखा प्रभू होईल तयाचा


(टीप:- प्रत्येक ओळीतील दुसरे अक्षर सलग वाचावे.)


Rate this content
Log in