समाधान
समाधान
1 min
246
समाधान आहे कशात
नाही आपल्याला कळत
अडकते मन भौतिक
सुख देणाऱ्या गोष्टींत
समाधान मानण्यावर असते
समाधान नसे गोष्टीत
अंथरूण पाहून पाय पसरण्यात
दडते आपल्या साऱ्यांचे हित
समाधान दुसऱ्यांच्या मदतीला धावण्यात
समाधान वेळोवेळी उपयोगी पडण्यात
समाधान रक्तदान करण्यात
समाधान ज्ञान देण्यात
समाधान मिळता होई मन तृप्त
न वाटे लालसा ना वाटे मत्सर
काही नसताना वाटे श्रीमंती
अवलंबले साऱ्यांनी तंत्र जर