समाधान...!
समाधान...!
जन्मभर खस्ता खाल्या
अजूनही या काटेरी
फांदीवर बसुन हाल सोसतोय
आता मूलं सुधारलीत वाटतंय...!
म्हणतात ना आई बाप
झाल्या शिवाय अक्कल येत नाही
बघ ना मुलांसाठी
आपली मुलं कशी धडपडतात
रोज पैशासाठी
धावाधाव करतात
एका एका काडीने
संसार सजवता आहेत
वाटलं नव्हतं
आपली मुलं स्वतःच्या पायावर उभी राहतील
पण खरं सांगू आपण
गेल्यावरच मूलं सुधारली
आज आठवणीने
सर्व विधी आनंदाने केले
आदराने पक्ष पंधरवडा
मोठ्या श्रद्धेने पार पाडला
बरे वाटते आता
आपली मुलं पर्यावरणाची
पण काळजी घेतात
झाड लावण्याचा ,जगवण्याचा प्रयत्न करतात
चल आपण जाऊ माघारी
आता काळजी करण्याचं
विशेष काही कारण नाही
मूल शिकली सुजाण झाली
अजूनही माया ममता स्नेह सहिष्णुता
सारे संस्कार शाबूत आहेत
आपल्या वधीलधाऱ्यांच्या बद्दल आदर आहे
म्हणून तर आपल्या देशाचे भविष्य उज्वल आहे..!
