सख्या रे...
सख्या रे...
1 min
404
सख्या...रे..
चिंब ओथंबलेली पालवी
नकळत हसु लागली
आगमन सख्या तुझे
अंतरी चाहुल वाजली ||१||
सप्तर्षी सुमनाच्या पाकळ्यात
कस्तुरी सुमधुर गंधाळली
स्वराने सख्या तुझ्या
ह्दयी मल्हार धून नादावली ||२||
अंकुरली बीजे वनी
लता मुक्त संचारली
पावलाने सख्या तुझ्या
अंगणे अमृताने माखली ||३||
झेपावली सांजधारा
काजवे लख्ख चमकती
आठवाने सख्या तुझ्या
सजल्या स्वप्नांच्या राती ||४||
