STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

*सखी लावण्याची खाणी*

*सखी लावण्याची खाणी*

1 min
41.8K




पहीली वहिली भेट आपली

आल्या दाटून अमृतवेल आठवणी

मन धावतेय भूतकाळात

तूच माझी सखी लावण्याची खाणी


स्मरते ती पहिली भेट आपुली

सांज काहीशी झुकलेली

तार्‍यांनी बहरलेली नभांगणी

तूच माझी सखी लावण्य खाणी


तू दबक्या पावलांनी आलीस

तुझ्या पैंजणांच्या आवाजाने दगावलीस

तुझ्या येण्याची खबर मिळाली मनी

तूच माझी सखी लावण्याची खाणी


काय बोलावे तुला कळत नव्हते

मला तरी कुठ काय उमजत होते

आपण होतो भातुकलीतील राजा राणी

तूच माझी सखी लावण्याची खाणी


काही न बोलणारी ,नजरेतून सांगणारी

अशा कितीतरी तुझ्या आठवणी

रमतो मी त्या परत परत स्मरूनी

तूच माझी सखी लावण्याची खाणी


स्वप्नात येणारी,झुल्यावर बसणारी

प्रेमसंदेश पाठवणारी ,धुंद होणारी

सखी माझी गाते गाणी

तूच माझी सखी लावण्याची खाणी


Rate this content
Log in