सखे
सखे


तू निराश असताना सखे
तुला स्फुर्ती देणारा
आशेचा किरण मला व्हायचयं।।
तू दुःखी असताना
तुझा चेहरा तेजस्वी करणारी
हास्याची लकेर मला व्हायचयं।।
जिथं तुला थकल्यावर
क्षणभर विसावा वाटेल
असा किनारा मला व्हायचयं।।
माहीत आहे क्षणभरच आस्तित्व असेल माझं
तरीही तुझ्या ओंजळीत येण्यासाठी
पावसाच्या गारा मला व्हायचयं।।