सिंह राशी
सिंह राशी
1 min
198
तत्वप्रिय अन् अहंकारी
ऐटीत यांचे चालणे
स्पष्ट पहा यांची वाणी
शिस्तीत सिंहाची राहणी
आपलेच म्हणणे खरे करती
स्वतःचा ठसा उमटवती
समाजात मिळतो बहुमान
सिंहाचं बघा वेगळंच स्थान
पुढे पाऊल हे टाकिता
हळूच मागे नजर मारती
तल्लख बुद्धी सिंहाची पहा
स्वतःच्या चुका सुधारती
क्षणात भस्म करतील हे
तत्व या राशीचे अग्नी
कर्तृत्ववान अन प्रामाणिक
असते ही सिंह राशी
