सिगरेट
सिगरेट

1 min

11.4K
सिगरेटची साथ
करेल तुमचा घात
पांढरा हिचा रंग
लोक होतात हिला ओढण्यात दंग
नशा आहे ही वाईट
फुप्फुसांना करावे लागते फाईट
लागतात आजाराचे भोग
भयंकर आहे कर्करोग
पसरतो सगळीकडे धूर
इतरांना ठेवतो आपल्यापासून दूर
कोणी देत नाही मान
जरी वाटली काहींना ही शान
तोंडाची होते आग
करा सिगरेटचा आजच त्याग
वाढवी रक्तदाब
नका समजू छोटी बाब
व्यसन हे आवरा
वेळीच सावरा