STORYMIRROR

Shila Ambhure

Others

4  

Shila Ambhure

Others

शून्य

शून्य

1 min
42K



भरला होता एकदा

अंकांचा मोठा बाजार

मोठेपणा गाण्यात

प्रत्येकजण बेजार.

दूर होते बसलेले

शून्य एकटे रुसून

सारे अंक बघायचे

त्याच्याचकडे हसून.

सारे म्हणतात त्याला

गोल गोल भोपळा तू

काही ना किंमत तुला

आकाराने वाटोळा तू.

शून्य बोले धाडसाने

दिसतो मी साधाभोळा

किंमत वाढवणारा

आहे मी अमोल गोळा.

एकाचे होतात दहा

बसता मी एकापुढे

गुणून भागून तुम्हा

करेन मी शून्य गडे.

ऐकुनि बोल शून्याचे

घाबरले अंक सारे

महत्व जाणूनि त्याचे

शून्याला घालती वारे.



Rate this content
Log in