शुक्रवार सायंकाळ...!
शुक्रवार सायंकाळ...!
1 min
30.5K
शहरातली बेगडी सायंकाळ
कोठेतरी चकवा देते
पहाता पहाता अंधकार
उरात पटकन साठवते
क्षणभर नजर हटता
तो नजरे आड झाला
स्वार्थी दिव्यांनी मग
आपला उजेड पाडला
काजव्यांची जात ही
बुडाशी प्रकाश घेऊन जगणारी
हवं हवं ते सारं बुडाशी
स्वतःच्याच सदैव घेणारी
आज सांजेला कीव मला
त्यांची करावी वाटली
निस्वार्थी जीवनाची ज्योत
हृदयी त्यांच्या पेटवली....!
