शुक्राची चांदणी..!
शुक्राची चांदणी..!
1 min
23.6K
पूर्वाभिमुख पहाट पारी
फिरण्याची आली लहर
गार गार वाऱ्याने केला
पहाटे पहाटे कहर
पाठीवरी पौर्णिमेचा चन्द्र
वायव्येला होता साक्षीस
दिसत होती देखणी
शुक्राची चांदणी आग्नेयेस
हसुनी म्हणे चंद्र मला
टाकतोस का बघ नजर
सकाळीच आली असावी
याला थट्टेची लहर
म्हंटले रूप राजाचे गुण खाजदाराचे
काय करू मी सांग
वाकडी मान करुनी पाहू कशाला
विस्कटेल ना माझा भांग
आपल्या नशिबी वेड्या
कळकट मळकट कामाला बळकटं
काय करायची ती देखणी
शुक्राची चांदणी बावळटं .....!
