STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शुद्ध लेखन..!

शुद्ध लेखन..!

1 min
15.1K


कोणाचे जेव्हा कोनाचे होते

तेव्हा जीवन

कोना कोनात फरपटते

शुद्ध अशुद्धतेची

शुद्ध हरपता

अर्थाच्या अनर्थात गुरफटते..


कोणाला पटते

कोणाला नडते

कोनात कानशिलात बसते

अर्था साठी मग तेंव्हा

अनर्थक चर्चा करण्या

मनोमन्दिरी मन वसते...


अर्थ लागता

प्रसन्नता आपोआप

मग चेहऱ्यावर खुलते

अर्थयुक्त शब्दांची

ओंजळ खुलता

आनंदाची बाग फुलते...


शब्द सामर्थ्याची

किमया सारी

शुद्ध लेखनातच सापडते

जेव्हा ण चे न अन न चे ण

आपोआपच होणे थांबते

तेव्हा लेखनाचे खरे मर्म कळते....!




Rate this content
Log in