STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

श्रीखंड....!

श्रीखंड....!

1 min
5.0K


श्रीखंड..!!!


श्रीखंडाची अवीट गोडी

स्नेहाचे सहज नाते जोडी

पोट भरले तरी काढे खोडी

ताटात भर पडे आग्रहाची थोडी


सणावाराची हमखास वर्णी

साधती सुगरणी ही पर्वणी

साधी सोपी अवीट गोडीची करणी

खास मेनू ठेवीती जेवणास गृहिणी


आग्रह करकरुनी पोट भरती

जड पोटाने पंगती उठती

ओट्यावरती गप्पा रंगती

वामकुक्षी घेण्या सहज कलंडती


तृप्तता लाभता अंतरातम्याला

आशीर्वाद देती घरच्या धन्याला

कौतुक करती खाऊन श्रीखंडाला

सण साजरा होता उधाण येते आनंदाला


नवं वर्षाचा हा आनंद सोहळा

साजरा करण्या येती शुभेच्छा घेऊन

मित्र मैत्रिणी अन सारे आप्तजन

समाधानी होती श्रीखंड खाऊन


अवीट गोडीच्या श्रीखंडाची महती मोठी

थोडाच केसर अन वेलची स्वादासाठी

बेत आखला जातो या सणासाठी

सनई वाजवून अंगणी प्रेमापोटी....!!!


Rate this content
Log in