श्री महालक्ष्मी प्रसन्न...!
श्री महालक्ष्मी प्रसन्न...!
मुखकमल तुझे प्रथम पाहता
प्रसन्नता मज अलौकिक लाभली
कृपा दृष्टी तुझी पाऊनी आई
इच्छा मनीची आज पूर्ण झाली
तूच आई आधार मज या धरणीवरी
सारा भार माझ्या जीवनाचा तुझ्यावरी
तुझं करती धरती मला एक जीवनी
दे आशीर्वाद ग लेकरा प्रसन्न होऊनी
आई मी लेक तुझा कसाही असलो जरी
सांभाळ करी माझा तू माय होउनी
तुझ्या कृपा प्रसादे जीवन कृतार्थ होऊदे
आशीर्वादाचा हात तुझा सदा शिरावरी राहू दे
हीच विनवणी माझी आई
सदैव तुझ्या अंतरी राहू दे
कृपा दृष्टी सदैव तुझी
माझ्यावरी अखंड राहू दे
नतमस्तक तुझ्या चरणी मी
आलो बघ तुला भेटण्याला
डोळे भरुनी पहा आई मज
जीवन माझे कृतार्थ होण्याला.....!!!
