श्री महालक्ष्मी प्रसन्न ...
श्री महालक्ष्मी प्रसन्न ...
1 min
13K
ओम नमो नारायणी
सहज ओठी येते
वाचा काया सारी
शुचिर्भूत शुद्ध होते
पूर्णिमेचा चंद्रही पहा
तेजाचा दीप प्रज्वलित करतो
त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून
आसमंत सारा तेजोमय होतो
तेज दिव्यांचे आई पहा
पाणीदार डोळ्यात आपल्या साठवते
युगान युगे तेच तेज सदैव
आम्हास आशीर्वाद रूपे अविरत वाटते
दर्शन घेता दुःख दारिद्री अवघे
दूर पळून जाते
सौख्य समाधान शांती घेऊन
श्री महालक्ष्मी माझ्या घरी येते...!
