STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

श्री महालक्ष्मी प्रसन्न...!

श्री महालक्ष्मी प्रसन्न...!

1 min
885


शुक्रवारच्या पहाट पारी आलो दर्शनाला

मागणे आई तुझ्या ठायी मागण्याला।।धृ।।


उठ लवकर बाई सारी तिष्ठली दाराला

दर्शन दे ग लवकरी तुझ्या लेकराला...१


मुखमार्जन करुनि सत्वर पहा जरा बाई

साऱ्यांना झाली तुझ्या दर्शनाची घाई...२


स्तवन करुनी तुझे ,उभे सारे तुझ्या सामोरी

उघड डोळे लवकर पहा मायेने झडकरी..3


तुझ्या कृपा प्रसादे जीवनी आनंद येयी

आशीर्वादास्तव आलो सारे तुझ्या पायी..४


प्रसन्न होउनी वरदान दे तू सर्वांना

हर्ष होऊ दे मनी तुझे स्तवन गाताना...५


अशीच सेवा तुझी घडू दे हेच आई मागणे

लेखणीची अभा फाकु दे हेच तुला सांगणे...!



Rate this content
Log in