श्रावण महिना
श्रावण महिना

1 min

14
घननिळ्या श्रावणात
मन मोर आनंदतो
रिमझिम धारा अंगी
जीव खूप सुखावतो.
धरा नव वधू भासे
शालू हिरवा नेसुनी
सुख मनाला मिळते
साज हिरवा पाहुनी.
खेळ ऊन पावसाचा
चाले वसुंधरेवर
सप्तरंगी ती कमान
दिसे छान नभावर.
श्रावणात सण सारे
आनंदाचे उत्साहाचे
जिव्हाळ्याचे एकोप्याचे
देती आनंद सौख्याचे.
सण मंगळा गौरीचा
येती लेक माहेराला
झिम्मा फुगडी घालण्या
रात्र सारी जागायाला.
व्रत वैकल्ये करती
पुजा पाठ देवळात
शांत सुखद श्रावण
येतो एकदा वर्षात.